पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार : संपूर्ण आयुष्य संस्कृतच्या प्रसारासाठी वाहून घेतलेले विद्वान, व्यासंगी पंडित
१९८६मध्ये महाराष्ट्र शासनाने १०० गुणांचा हिंदीचा पेपर अनिवार्य केला. त्यामुळे मराठी माध्यमात शिकणाऱ्यांना संस्कृत, पाली, अर्धमागधी अशा अभिजात भाषा शिकण्याची सोय राहिली नव्हती. बिराजदार आणि कवीश्वर यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आठवीपासून संस्कृत, पाली, अर्धमागधी शिकता येते. त्याबद्दल बिराजदार आणि कवीश्वर यांचे ऋण विसरता येणार नाहीत.......